Heavy Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Heavy Rain Maharashtra: पर्यटनाला जाऊ म्हणताय? घराबाहेर पडण्यापूर्वी पावसाचा अंदाज घ्या. हवामान विभागाने (India Meteorological Department) मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो (Yellow Alert) आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. खास करुन कोकण आणि विदर्भामध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासारख्या जिल्ह्यातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या (8 आणि 9 जुलै) पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज रात्री पाऊस पडेल का, असाही सवाल काही लोकांना पडला असेल तर त्याचे उत्तर आहे. होय, आज रात्रीही पाऊस पडू शकेल.

राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असला तरी काही भाग मात्र अद्यापही कोरडा ठक्क आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पावसाची प्रचंड आवश्यकता आहे. खास करुन मराठवाड्यामध्ये पावसाची गरज अधिक आहे. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रातील आटपाडी, खानापूरसारख्या काही तालुक्यांमध्ये अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. यंदा मान्सून काहीसा उशीरा सुरु झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाला विलंब लागला. अशा स्थिती म्हणावा तसा पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (हेही वाचा, Maharashtra Weather Alert: येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकणाला रेड अ‍ॅलर्ट)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात पाऊस कोसळत असला तरी तो म्हणावा तसा कोसळत नाही. त्यामुळे पावसाची मोठ्या प्रमाणावर कमतरतात दिसत आहे. राज्यात अजून 38% पावसाची गरज आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राचा विचार करायचा तर या भागांमध्ये अजूनही 13 टक्के पावसाची गरज आहे. मराठवाड्यातही उपविभागांसह विचार केल्यास 64% पाऊस आवश्यक आहे. विदर्भातही 56% पाऊस आणखी पडला तर नेहमीनुसार काठिण्यपातळी भरणार आहे.

यंदा पाऊस मनासारखा पडणार की, हुलकावणी देणार याबाबत उत्सुकता आहे. राज्यातील शेतकरी चिंतेत असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वेळीच काही मदत करावी अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र, राज्य सरकारही अजून सावध पावले टाकताना दिसत आहे.