Mumbai Rain (Image Credit - ANI Twitter)

मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात दोन दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अशातच येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर (Weather Updates)  वाढणार असा इशारा हवामान विभागाने कडून देण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आला आहे. तर कोकणाला रेड अर्लट देखील जारी केले आहे.  (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट')

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचे कमबॅक झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून यंदा काही अंशी दुबार पेरणीचे संकट टळले आहे. दरम्यान हवामान विभागाने कोकणाला रेड अलर्ट जारी केला असून काही भागात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. याशिवाय पालघर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.येत्या 24 तासांत मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.