प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Maharashtra Weather Update: मान्सून (Monsoon)  चा महाराष्ट्रात प्रवेश झाल्यानंतर आता मागील दोन दिवसात राज्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस पोहचला आहे. मुंबई सह, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी येथे काही दिवसांपासून जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच आता सांगली (Sangali) जिल्ह्यातून पावसाचे एक अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, सांगली मध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोयना, वारणा-चांदोली आणि कणेर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे कृष्णा (Krishna) आणि वारणा (Warna) नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र: 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला अलमट्टी धरण कारणीभूत नसल्याचे समितीकडून स्पष्टीकरण

दुसरीकडे आज मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. तरीही आज मुंबईत समुद्रात भरतीच्या वेळी उंच लाटा उसळणार असल्याने समुद्र जवळच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनआय यांनी मरिन ड्राईव्ह येथील समुद्रातील उंच लाटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जोरदार आदळत असल्याचे दिसून येत आहे. इथे पहा व्हिडीओ

AIR ट्विट

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच महिन्याभरासाठी अपेक्षित असलेल्या 50 टक्के पावसाची नोंद झाली आहे, राज्यात आतापर्यंत 386.22 मिमी पावसाची नोंद झाली आहे.