Marin Drive (Photo Credits-ANI)

राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर सुद्धा पावसाची राज्यातील विविध जिल्ह्यात हजेरी पहायला मिळाली होती. याच दरम्यान, मुंबईतील पावसाची मजा घेण्यासाठी नागरिक बाहेर पडतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांनी घरात थांबवणेच पसंत केले होते. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात समुद्राच्या मोठ्या लाटा कधी उसळणार याबाबतचे वेळापत्रक हवामान खात्याकडून जाहीर करण्यात येते. तर आता मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे आज सकाळी 11.48 मिनिटांनी समुद्रात मोठ्या लाटा उसळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी तेथे जाऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

एनआय यांनी मरिन ड्राईव्ह येथील समुद्रातील उंच लाटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जोरदार आदळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच समुद्रांच्या या लाटांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांनी नागरिकांना तेथे जाण्यापासून दूर रहावे असे म्हटले आहे.(महाराष्ट्र: 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला अलमट्टी धरण कारणीभूत नसल्याचे समितीकडून स्पष्टीकरण)

Tied Forecast यांनी समुद्रात कधी Low Tide आणि High Tide असणार आहे याचे आजच्या दिवसातील वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आज पहाटे 4.54 वाजता समुद्रात 0.64 मीटरची Low Tide होती. त्यानंतर 11.48 मिनिटांनी समुद्रात उसळलेल्या लाटांची उंची 4.30 मीटर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 5.44 मिनिटांनी 1.83 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. रात्री 11.18 मिनिटांनी 3.63 मीटरच्या उंच लाटा समुद्रात उसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.