Maharashtra Rain: जुलै महिन्यापासून राज्यभरात पावसाने(Rain) धुमाकुळ घातला आहे. आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने इशारा दिला आहे. या गोष्टीची खबरदारी म्हणून काही परिसरातील शाळांना सुट्टी झाहीर केलं आहे. काही दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाली. हवामान विभागाने (IMD) आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. मुंबई उपनगरात आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस चालू आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज काही पुढील तीन चार दिवस मुसळधार पावसाचे असणार असल्याचे सांगितले आहे. काल मुंबईत २०० मिमी हून अधिक पावसाची नोंद झाली. तर आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून दिला जात आहे. मुंबई उपनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट तर रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज देण्यात आला आहे.
विदर्भात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आंनी मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी शाळांना तसेच सर्व महाविद्यालयांना आज गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होते त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात. पानलोट क्षेत्रात पूर येऊन पिकांचे नुकसान होऊ शकते. तर शहरी भागात वाहतूक कोंडी होऊ शकते यामुळे नागरिकांनी बाहेर पडण्याआधी आपल्या परिसरातील पावसाचा आणि वाहतुकीचा अंदाज घेऊन बाहेर पडावे असे आवाहन कारण्यात आले आहे.