Rains | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

 Maharashtra Weather Alert:  राज्यभरात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पावसाने थैमान माजवले आहे. आता राज्यात पुढील 48 तासांत अनेक भागात मुसळधार पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने दर्शवले आहे. मुख्यमंत्रीच्या आदेशानुसार आज मुंबई, ठाणे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला आहे.  कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह  पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात कोकणातील घाट भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील काही भागात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस  पडण्याचा अंदाज दर्शवला आहे.  मराठवाडा आणि विदर्भात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होता. आता ही पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी मोठं मोठे भुस्खलन होत असल्याचे घटना घडत आहे. त्यामुळे नागरिकांची जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसरकारकडून सर्तक राहण्याचा इशारा दिला जात आहे.