Maharashtra Rain Forecast: राज्यात 31 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा IMD चा इशारा
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपाछुपीचा खेळ चालू आहे. मध्येच आभाळ भरुन येतं तर काही काळासाठी ऊन पडतं. परंतु, 31 ऑगस्ट काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामाना खात्याने वर्तवला आहे. आयएमडी (IMD) चे उपमहासंचालक के. एस. घोसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई शहरातील काही भागांमध्ये पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. घोसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. (Maharashtra Rain Forecast: पुढील 5 दिवस राज्यात काय असेल पावसाची स्थिती? जाणून घ्या)

27 ऑगस्टच्या दिवशी आणि मध्यरात्री ठाणे विभागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला, अशी आयएमडीच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे देण्यात आली आहे. तर सांताक्रुझ भागामध्ये ढगाळ वातावरणासह थंड वारे वाहत होते. यामुळे त्या विभागातील तापमान 25.4 अंश सेल्सियस इतके झाले असून कुलाब्यामधील तापमान 26 अंश सेल्सियस इतके झाले आहे.

K. S. Hosalikar Tweet:

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाडा विभागात 30 ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये देखील 29 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी तर उत्तर कोकण आणि गुजरात मधील भागांत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.