महाराष्ट्रामध्ये आज विधानसभा निवडणूकींच्या (Maharashtra Vidhan Sabha Election Dates) तारखा दुपारी जाहीर होणार आहेत. अशामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. पण 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट हायकोर्टात गेला आहे. त्यांनी याविरोधात याचिका दाखल केली असून तातडीची सुनावणी होण्याचा अंदाज आहे.
राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणामध्ये हायकोर्टाचा अंतिम निर्णय राखीव असताना त्यांची नियुक्ती करणं असंविधानिक असल्याचं ठाकरे गटाचं मत आहे. कोल्हापूरचे ठाकरे गटाचे याचिका कर्ते सुनील मोदी त्याविरूद्ध कोर्टात गेले आहेत. सकाळी 10:30 वाजता मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे शपथविधीच्या स्थगितीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान निकाल राखून ठेवताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला कोणतेही निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे नियुक्त्या कायदेशीर असल्याचा दावा सरकार कडून करण्यात आला आहे. Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूकांच्या आज जाहीर होणार तारखा; दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद .
The case is pending in the High Court regarding the vacant posts of 12 MLCs appointed by the Governor, the High Court has completed the hearing on the petition of Kolhapur chief Sunil Modi and has reserved the order. Now the government has recommended the names of 7…
— ANI (@ANI) October 15, 2024
वरूण सरदेसाई यांनी ट्वीट करत उपस्थित केला सवाल
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण कोर्टात असताना, निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
हा विषय न्यायप्रविष्ट असताना हे सरकार नेमणूक कशी करू शकते?
महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही, हेच यावरुन दिसते.
— Varun Sardesai (@SardesaiVarun) October 15, 2024
महायुती कडून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये भाजपाकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी दिली आहे तर शिवसेनेकडून मनिषा कायंदे, हेमंत पाटील आणि एनसीपी कडून पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे. आज दुपारी त्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देणार आहेत.