Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

शिवसेना (Shiv Sena) अखेर कुणाची? उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) या प्रश्नाचं उत्तर आता लवकरचं राज्याच्या जनतेला मिळणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनुष्यबाण हे पक्षचिन्ह अखेर कुणाचं याबाबत सुनावणी निवडणुक आयोगापुढे पार पडणार आहे. येत्या १२ डिसेंबरला या बाबत निवडणुक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.  तर दोन्ही गटास स्वतची बाजू मांडण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास २३ नोव्हेंबर पर्यतचा कालावधी देण्यात आला होता. पुढील कागपत्रे सादर करायची असल्यास ९ डिसेंबर पर्यतची मुदत देण्यात आली आहे. या सगळ्या माहितीच्या आधारे धनुष्यबाण कुणाचा या बाबत निवडणुक आयोग निर्णय देईल. एवढचं नाही तर ज्या गटाचा धनुष्यबाण होईल त्याच गटाची खरी शिवसेना अशी समज आहे. म्हणुन ठाकरे आणि शिंदे गटासाठी ही निवडणुक पक्ष चिन्हाची लढाई नसुन प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. तरी शिवसेना कुणाची हा प्रश्नाच्या उत्तराची उत्सुक संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

 

निवडणुक आयोगासमोर धनुष्यबाणाच्या लढाईची ही पहिलीचं सुनावणी असणार आहे. तरी शिंदे गटावर कायमच ठाकरे गट पन्नास खोके एकदम ओके असा आरोप करताना दिसतात. या खोके आरोपाचं निरासन अजुनही शिंदे गटातील एकही आमदार करु शकला नाही. तोच बाळाहेबांच्या विचारांची शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो. दोन विरोधीपक्ष एकमेकांविरुध्द आरोप करताना १०० वेळेस बघितलं असेल. पण एकचं पक्षाचं दोन गटात विभाजन होवून वाद शिगेला पेटण्याची ही पहिलीचं वेळ. (हे ही वाचा:- Shekhar Gore: उद्धव ठाकरे यांनी साताऱ्यात मोहरा बदलला, शेखर गोरे यांच्याकडे मोठी जबाबदारी)

 

एकनाथ शिंदेंनी बंड पुकारत आपला गट वेगळा काढला. एवढचं नाही तर शिवसेना पक्षासह शिवसेना पक्षचिन्हावर देखील दावा सांगितल्याने उध्दव ठाकरेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शिवसेनेतील जास्तीत जास्त आमदार आणि खासदार शिंदे गटाबरोबर असल्याने शिंदे गटाची ही जमेची बाजू आहे तर ठाकरे गटास मात्र ठाकरे आडनावचा मोठा फायदा होत आहे. तरी शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाणावर हक्क कुणाचा ह्या बाबतची पहिली सुनावणी १२ डिसेंबरला पार पडणार आहे.