शिवसेना (Shiv Sena) अखेर कुणाची? उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) या प्रश्नाचा न्यायनिवाडा आता निवडणुक आयोग करणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनुष्यबाण हे पक्षचिन्ह अखेर कुणाचं याबाबत सुनावणी निवडणुक आयोगापुढे पार पडणार आहे. आज याप्रकरणी निवडणुक आयोगापुढे सुनावणी पार पडली आहे. तर दोन्ही गटास स्वतची बाजू मांडण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास २३ नोव्हेंबर पर्यतचा कालावधी देण्यात आला होता. पुढील कागपत्रे सादर करायची असल्यास ९ डिसेंबर पर्यतची मुदत देण्यात आली होती. या सगळ्या माहितीच्या आधारे धनुष्यबाण कुणाचा या बाबत निवडणुक आयोग निर्णय देणार आहे. तरी या पहिल्या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाकडून महत्वपूर्ण युक्तीवाद बघायला मिळाला. एवढचं नाही तर ज्या गटाचा धनुष्यबाण होईल त्याच गटाची खरी शिवसेना अशी समज आहे. म्हणुन ठाकरे आणि शिंदे गटासाठी ही निवडणुक पक्ष चिन्हाची लढाई नसुन प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.
शिवसेना कुणाची हा प्रश्नाच्या उत्तराची उत्सुक संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. पण आज निवडणुक आयोगाने याबाबत कुठलाही निर्णय दिला नसुन ही सुनावणी पुढील वर्षी होणार म्हणजे २०२३ च्या जानेवारी महिन्यात होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. निवडणुक आयोगातील या सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे प्रतिनीधी उपस्थित होते. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात होणार आहे, पहिल्या आठवड्यात यावर चर्चा होणार आहे, कोणत्या पक्षाने किती सदस्यांनी माहिती दिली, किती कागदपत्र सादर केली, याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Mumbai Weather Report: मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्य सरकारवर टीकास्त्र; प्रदूषणाचे स्रोत शोधून कारवाईची मागणी)
निवडणुक आयोगासमोर धनुष्यबाणाच्या लढाईची ही पहिलीचं सुनावणी पार पडली. तरी शिंदे गटावर कायमच ठाकरे गट पन्नास खोके एकदम ओके असा आरोप करताना दिसतात. या खोके आरोपाचं निरासन अजुनही शिंदे गटातील एकही आमदार करु शकला नाही. तोच बाळाहेबांच्या विचारांची शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो. दोन विरोधीपक्ष एकमेकांविरुध्द आरोप करताना १०० वेळेस बघितलं असेल. पण एकचं पक्षाचं दोन गटात विभाजन होवून वाद शिगेला पेटण्याची ही पहिलीचं वेळ. तरी निवडणुक आयोगाच्या सुनावणी नुसार शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाचा या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला नवीन वर्षात मिळेल.