आम्ही शिवसेना (Shiv Sena) सोडली नाही. सोडणार नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. त्यामुळे आम्ही इतर कोणत्या पक्षात जाण्याचा प्रश्नच मुळात उद्भवत नाही. आमच्याकडे दोन तृतियांश इतके बहुमत आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाने ( Eknath Shinde Group) व्यक्त केली आहे. शिवसेनेतील बंडखोर असलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची पत्रकार परिषद आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही भूमिका व्यक्त केली.
शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कामे होत नाहीत
मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही जनतेची कामे होत नाही. शिवसेना विरोधात होती तेव्हा जनतेच्या फारशा अपेक्षा नव्हत्या. शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती. परंतू, दुय्यम भूमिकेत होती. तेव्हाही लोकांमध्ये फारशा आपेक्षा नव्हत्या. पण आता शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे लोकांच्या आपेक्षा आहेत. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आहे त्यामुळे त्याचा फायदा शिवसेना वाढीसाठी व्हायला हवा. मुख्यमत्री पद शिवसेनेकडे असूनही त्या फायदा सर्वसामान्यांना आणि शिवसेना वाढीसाठी होत नसेल तर, त्याचा काय फायदा? असा सवालही दिपक केसरकर यांनी या वेळा केली. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray on Eknath Shinde: स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, उद्धव ठाकरे यांच्याकडून पहिल्यांदाच थेट हल्लाबोल)
शिवसेनेकडे कमी महत्त्वाची खाती
दिपक केसरकर यांनी पुढे म्हटले की, आम्ही निवडूणच मुळात शिवसेना-भाजप युतीद्वारे निवडून आलो. पुढे जाऊन आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले. सत्तेचे वाटप करताना मुख्यमंत्री पद सोडले तर इतर सर्व प्रकारची महत्त्वाची खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देण्यात आली. आणी सर्व दुय्यम खाती शिवसेनेकडे आली. त्यामुळे शिसेनेचे आमदार असूनही, सत्तेतील क्रमांक एकचा पक्ष असूनही आमदारांची कामे होत नव्हती. प्रत्येक वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांपुढे हात जोडून उभे राहावे लागत असे. त्यामुळे आमदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. या नाराजीतूनच ही घटना घडली, असे दिपक केसरकर म्हणाले.
होय आम्ही ओळख परेडला तयार आहोत
आमच्याकडे दोन तृतियांश इतके बहुमत आहे. त्यामुळे गरज पडल्यास आम्ही विधिमंडळ सभागृहात ओळख परेड करायलाही तयार आहोत. आमच्याकडे असलेली लोकं खरी आहेत. आपण व्हिडिओ आणि सर्व माध्यमातून पाहात असाल. दुसऱ्या बाजूला दिपक केसरकर यांनी गुवाहाटी येथे असलेल्या आमदारांच्या घरांवर, कार्यालयांवर होत असलेले हल्ले थांबविण्यात यावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठे कार्यक्षम नेते आणि मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी हे हल्ले थांबविण्याचे अवाहन करावे. सध्या महाराष्ट्रात जे वातावरण सुरु आहे ते पाहता आम्हाला असुरक्षीत वाटते आहे. राज्यात अशी जर अराजकता निर्माण झाली तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराही दिपक केसरकर यांनी या वेळी दिला.