शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर यांच्यावर पहिल्यांदाच हल्लाबोल केला आहे. शिवसेना पक्ष कार्यकारीणीची एक बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली. या बैठकी वेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सुरुवाताली ते नाथ होते आता ते दास झाले आहेत. जर तुम्हाला वेगळे काही करायचे आहे तर शिवसेना आणि ठाकरे हे नाव न वापरता जगून दाखवा. जर तुम्हाला मते मागायची आहेत तर स्वत:च्या बापाच्या नावाने मागा. आमच्या आणि शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांचा गट 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे नाव धारण करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून पुढे आले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब, शिवेसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस)
उद्धव ठाकरे यांनी या वेळी ठासून सांगितले की, ज्यांना जायचे आहे त्याना जाऊ द्या. बंडखोरांना अडवू नका. आपण आपली रणनिती ठरवू. शिवसैनिकांची एकजूट कायम ठेवा. आपण बंडखोरांना धडा शिकवू. लक्षात ठेवा शिवसेना हा निखारा आहे. त्यावर पाय ठेवाल तर जळून खाक व्हाल, असा इशाराही मुंख्यमंत्र्यांनी दिला.