Maharashtra Police Mega Bharti: महाराष्ट्र पोलिस मेगाभरती मध्ये मराठा समाजासाठी 13% जागा बाजुला काढुन कायद्यानुसार न्याय देणार- अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र पोलिस दलात (Maharashtra Police Mega Bharati) तब्बल 12,500 पोलिसांची भरती (Maharashtra Police Bharti 2020) होणार असल्याची माहिती काल गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली होती. यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु होईल असेही सांंगण्यात आले होते मात्र एकीकडे मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाली असताना अशी भरती करुन घेणे हा मराठा समाजावर अन्याय होईल अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षाने दिली आहे. या पार्श्वभुमीवर आता अखेरीस अनिल देशमुख यांंनी उत्तर देत राज्य सरकारची बाजु स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र पोलिस मेगाभरती मध्ये मराठा समाजासाठी 13% जागा बाजुला काढुन त्यातील कायदेशीर बाबी तपासुन न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे देशमुख यांंनी ट्विट मध्ये म्हंंटले आहे. Maratha Kranti Morcha Protest In Maharashtra: मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; रावसाहेब दानवे, अमित देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन

मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्याचा राज्य सरकारचा पुर्ण प्रयत्न आहे असेही देशमुख यांंनी पुढे व्हिडिओत सांंगितले आहे. यापुर्वी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांंनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंंतर आपण मराठा समाजाच्या बाजुने खंबीर पणे उभे आहोत येत्या दोन ते तीन दिवसात राज्य सरकार आपली भुमिका स्पष्ट करणार आहे असे सांंगितले होते.

Nitesh Rane on Maharashtra Police Mega Bharti 2020: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरच सर्वात मोठी मेगा भरती का? भाजप आमदार नितेश राणे यांचा सवाल

अनिल देशमुख ट्विट

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटकाळात पोलिस दलावर येणारा तणाव पाहता पहिल्यांंदाच एवढी मोठी भरती केली जाणार आहे. ही भरती करताना मराठा समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची हमी आज अनिल देशमुख यांंनी हा व्हिडिओ पोस्ट करुन दिली आहे.