मुंबई : राज्यात मोठ्या कालावधीनंतर पोलीस भरतीला (Maharashtra Police Bharti) सुरूवात झाली आहे. तब्बल 17 हजार पदांसाठी कॉन्स्टेबल/ कॉन्स्टेबल ड्राइवर/ आर्म्ड पुलिस कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कॉन्स्टेबलसाठी 10300 पदे, कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 4800 आणि सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी 4124 पदे राखीव आहेत. राज्य सरकारकडून काही महिन्यांपूर्वी त्याबाबतची घोषणा करण्यात आली होती. परंतू विविध अडथळ्यांमुळे भरती जाहीर होत नव्हती. अखेर, पोलीस भरतीला सुरूवात झाल्याने युवकांची धाकधुक वाढली आहे. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून (5 मार्च) सुरू होत आहे. 31 मार्च पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
पद भरती : पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे.
शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपये शुल्क भरावे लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.
पोलीस भरतीची प्रक्रिया : या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळालेले उमेदवार अपात्र ठरतील.
महाराष्ट्र जिल्हानिहाय पोलीस भरती वेबसाईट:
जिल्हा वेबसाईट
अहमदनगर https://ahmednagardistpolice.gov.in/
अमरावती https://amravaticitypolice.gov.in/
औरंगाबाद https://aurangabadcitypolice.gov.in/
बीड https://beedpolice.gov.in/
भंडारा http://bhandarapolice.gov.in/
बुलढाणा https://buldhanapolice.gov.in/
चंद्रपूर https://chandrapurpolice.gov.in/
धुळे https://dhulepolice.gov.in/
गडचिरोली https://gadchirolipolice.gov.in/
गोंदिया https://gondiapolice.gov.in/
हिंगोली https://hingolipolice.gov.in/
जालना https://jalnapolice.gov.in/
कोल्हापूर https://kolhapurpolice.gov.in/
लातूर https://laturpolice.gov.in/
नागपूर https://nagpurpolice.gov.in/
नांदेड https://nandedpolice.gov.in/
नंदुरबार https://nandurbar.mahapolice.gov.in/
उस्मानाबाद https://osmanabadpolice.gov.in/
पालघर https://palgharpolice.gov.in/
परभणी https://parbhanipolice.gov.in/
पुणे https://punepolice.gov.in/
रायगड https://raigadpolice.gov.in/
रत्नागिरी https://ratnagiripolice.co.in/
सांगली https://sanglipolice.gov.in/
सतारा https://satarapolice.gov.in/
सिंधुदुर्ग https://sindhudurgpolice.gov.in/
सोलापूर https://solapurpolice.gov.in/
ठाणे https://thanepolice.gov.in/
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अधिकृत वेबसाइट जारी करण्यात आली आहे. https://www.mahapolice.gov.in/police-recruitment/ इथे जाऊन उमेदवार आपला अर्ज भरू शकतात. त्याशिवाय, 1800-233-1100 हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. त्यावर संपर्क साधून अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या समस्यांचं निराकरण उमेदवार करू शकतात.