IED blast by Naxals on a police vehicle in Gadchiroli (Photo Credit: ANI/Twitter)

1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी यंदा गडचिरोली सह राज्याला हादरवणार्‍या IED blast शी संबंध असणार्‍या नर्मदा आणि त्यांचे पती राजन यांना अटक करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा देत त्यांची अटक गडचिरोली आणि तेलंगणा सीमाभागावर झाल्याची माहिती दिली आहे. 1 मे दिवशी नक्षलवाद्यांनी 15 पोलिस आणि एका ड्रायव्हरला भुरूंगाद्वारा घडवून आणलेल्या स्फोटात उडवले.

ANI Tweet

नर्मदा आणि त्यांचे पती हे मागील 25-30 वर्षांपासून नक्षलवादी चळवळीचा एक भाग आहेत. गडचिरोलीमध्ये घडवून आणलेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. नर्मदा या गडचिरोली नक्षलवादी चळवळीच्या प्रमुख आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नर्मदा या 58 वर्षीय असून सध्या त्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहेत. तर तिचे पती राजन 70 वर्षीय आहेत. या दोघांना पकडण्यासाठी लाखो रूपयांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं.