Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) बुलढाण्यातील (Buldhana) देऊळगाव राजा परिसरात ट्रक आणि बसचा अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव ट्रकने बसला (Truck Hits Bus) पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. ज्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस यवतमाळ स्थानकाहून औरंगाबाद येथे निघाली होती. या बसमधून एकूण 25 प्रवाशी प्रवास करीत होते. मात्र, बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथे आल्यावर दुपारी एक वाजताच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये बसचा पाठिमागचा भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, 18 जण जखमी झाले आहेत. यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- मुंबई मध्ये कार शोरूमच्या Sales Executive ने नवी कार देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची केली 75 हजारांची फसवणूक

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक पोलिसांनी याबाबत कळवले. महत्वाचे म्हणजे, स्थानिकांनी विलंब न करता, मृत आजीसह सर्व जखमींना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्वरीत उपचार मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले आहेत. अपघातात जखमी झालेले बहुतांशी प्रवासी रक्षाबंधन साजरा करून आपल्या गावी परत चालले होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याची माहिती अद्याप समोर आली नसून स्थानिक पोलीस तपास पोलीस करीत आहेत.