Jayant Patil On Maha Vikas Aghadi MLAs: जयंत पाटील यांचा 'त्या' आमदारांना इशारा म्हणाले 'राजकारणातून बाद केले जाईल'
Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

राज्यातील महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडणार अशी अफवा भाजपवाले सतत पसरवत असतात. परंतू, महाविकासआघाडी ((Maha Vikas Aghadi) सरकार पूर्णपणे स्थिर आहे. राज्यातील सरकार पडेल असे सांगणे हा केवळ भाजपचा स्वत:ला चर्चत ठेवण्याचा प्रयत्न आहे. महाविकासआघाडी सरकारमधून जर कोणी एखादा आमदार फुटलाच तर त्या आमदाराला राजकारणातून बाद केले जाईल, असा थेट इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला आहे. राजस्थानमध्ये काय घडले हे उदाहरण समोरच असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. जयंत पाटील हे महानगर डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

जयंत पाटील यांनी इशारा दिला की, जर एखादा आमदार महाविकासआघाडीतून फुटून इतरत्र गेलाच. तर महाविकाआघाडीतील राष्ट्रावादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन एक उमेदवार देतील आणि संबंधीत उमेदवाराचा पराभव करतील. त्यामुळे शक्यतो काणी आमदार अशा प्रकारचे धाडस करणार नाही. सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे राज्यासमोर आर्थिक अडचणी जरुर आहेत. परंतू कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर हे राज्य पुन्हा गतीमान होईल, भरारी घेईन, असेही पाटील यांनी सांगितले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने करत होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले आहे. फक्त मुंबई पोलिसांना आपल्या तपासाचे सादरीकरण योग्य वेळत करता आले नाही. त्यामुळे पोलिसांवर काही प्रमाणात टीका झाली इतकेच. देशात आज मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. कोरोना व्हायरस, वाढती महागाई, बेरोजगारी यांसह इतरही अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतू, या मुद्द्यांवर चर्चा न करता सुशांत प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रणाणावर केली जात आहे. (हेही वाचा, Shiv Sena Spokesperson List: संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; खासदार अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर यांच्यासह 10 जणांची प्रवक्तेपदी निवड)

प्रसारमाध्यमांतील काही लोक, वृत्तवाहिन्या सुपारी घेतल्यासारखे एकाच विषयावर 15-15 दिवस आदळआपट करत आहेत. लोक आता प्रसारमाध्यमांबाबतही उघडपणे बोलू लागले आहेत. लोकांनीच आता कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचे याचा विचार केला पाहिजे असेही पाटिल यांनी या वेळी म्हटले.

दरम्यान, राज्य सरकारने यंदा चोख नियोजन केले, व्यवस्थापण केले. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा यादी जिल्ह्यांना पूराचा फटका बसला नाही. मागच्या वर्षी पूराबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्याबाबत नियोजनही केले नव्हते. त्यामुळे या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असे पाटील म्हणाले. मागच्या सरकाच्या जलसंधारण आणि जलयुक्त शिवार योजनेवर जयंत पाटील यांनी टीका केली. मागच्या सरकारने जलयुक्त शवार योजनेचा आरंभ केला. त्यावर 9 कोटी रुपये खर्च केले. परंतू कामाचा दर्जा मात्र निकृष्ट राहिला. आम्ही त्याही वेळी कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. आता कॅगनेही त्यावर ताशेरे ओढले असल्याचे पाटील यानी सांगितले.