दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला परतीचा पाऊस पडतो. हा पाऊस साधारणत: आठवडाभर असतो. मात्र यंदा मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात परतीचा पाऊस ठाण मांडून बसला असून अजून जाण्याचे नाव घेत नाही. सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या किना-यावर चक्रवाती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासांत मुंबई, पुण्यात जोरदार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. तसेच हा परतीचा पाऊस मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात आठवडाभर राहणार असून 19 आणि 20 ऑक्टोबरला एक-दोन जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच मुंबईसह पुण्यात पुढील 24 तासांत पाऊस सुरु राहणे अपेक्षित आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर आणि त्या जवळील भागात पाऊस पडणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे जळगाव, अकोला, नागपूर हा परिसर कोरडाच राहील. तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात हलका पाऊस पडू शकतो.
स्कायमेटचे ट्विट:
मुंबईत १९ आणि २० ऑक्टोबर रोजी एक दोन जोरदार सरींसह तुरळक पाऊस सुरु राहण्याची शक्यता#MumbaiRains #punerains #weather https://t.co/UxzsqyMQHP
— Skymet Marathi (@SkymetMarathi) October 13, 2019
हेदेखील वाचा- महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रवास 15 ऑक्टोंबरला, हवामान खात्याचा अंदाज
पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहील व १९ आणि २० ऑक्टोबर रोजी एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. ह्या पावसाळी गतिविधी बहुधा दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी अनुभवल्या जातील.
हवामान अंदाजानुसार, ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राजस्थान आणि 15 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्रातून मान्सून बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा राज्यात पाऊस उशिराने सक्रिया झाल्याने आता परतीच्या प्रवासालासुद्धा उशिर लागणार आहे. महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी या वर्षात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.