महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai) ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून आज काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईजवळील कल्याण (Kalyan) भागात तसेच गोवा (Goa), सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि दक्षिण घाट भागात (South Ghat Area) ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत मुंबईतील पावसाचा जोर कमी होऊन नाहीसा होईल असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यासह परतीचा पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Monsoon Updates 2020: 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता- IMD
Scattered clouds seen over Kalyan side near Mumbai & Goa Sindhudurg and adjoining S ghat areas of Mah as seen from latest satellite and Goa radar images. pic.twitter.com/FXNDq1iVU4
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 27, 2020
1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं.
दरम्यान, यंदा अपेक्षित पाऊस झाला असून जुलै महिन्यात, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या अखेरीस पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यंदा झालेल्या पावासामध्ये अनेक रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले. भिंती कोसळून घरांचे, इमारतींचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडले. जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या सगळ्यात अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध झाले, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.