Maharashtra Monsoon: महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे तापमानात सुद्धा बदल झाला असून वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. याच अवकाळी पावसामुळे राज्यातील 7 जणांचा बळी गेला आहे. पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाचे असे म्हणणे आहे की, आणखी काही दिवस अशाच पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे.(Maharashtra Monsoon Update: पुणे, मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्यामध्ये पावसाची शक्यता- IMD)
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात वेगाने वाऱ्यावह तुफान पाऊस झाला. त्यामुळे वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये एका गर्भवती महिलेचा सुद्धा समावेश आहे. तर अंबाजोगाई आणि सानपवाडी मध्ये पाच जनावरांचा ही बळा गेला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बीड, केज आणि अंबाजोगाई जिल्ह्यात वीजांच्या कडकाटांसह पाऊस पडला.
Tweet:
तालुका मुरबाड ...गारपीट
गेल्या २४ तासात... pic.twitter.com/907ULQtZWe
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 3, 2021
बीड तालुक्यात नेकमूर मध्ये राधाबाई लोखंडे या रविवारी दुपारी शेतात काम करत होत्या. तेव्हा पाऊस पडू लागला तेव्हा त्या घरी परतत होत्या. याच दरम्यान त्यांच्यावर वीज पडून मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, राधाबाई यांच्यावर वीज पडली त्यावेळी त्यांच्या सासू सुद्धा तेथेच होत्या. त्यांना सुद्धा हलकी दुखापत झाली आहे. मृतक राधाबाई आठ महिन्यांची गर्भवती होती. अन्य एका घटनेत केज तालुक्यात पिट्टीघाट मधील गीता जगन्नाथ थॉब्रे यांचा मृत्यू झाला आहे. गीता जेव्हा शेतात काम करत होत्या त्यावेळी त्यांच्यावर वीज पडली.
तसेच परभणी येथे सुद्धा जोरदार पाऊस झाला. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत औरंगाबाद येथे सुद्धा दोन जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तर बदनपुर तालुक्याजवळ एका शेतकऱ्याचा वेगाने वाहणाऱ्या वाहनासह मुसळधार पावसादरम्यान वीज पडून मृत्यू झाला आहे.