महसूल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भुखंड घोटाळ्याचा आरोप लावला आहे. तसेच विधानसभेत विरोधकांकडून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप स्पष्टपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाला स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे जयंत पाटील संतापले आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात असे म्हटले आहे की, पुण्यातील (Pune) बालेवाडी मधील एका ठिकाणी असलेला भुखंड मैदानासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र त्याच मैदानावर एका बिल्डरने 25 गुंठा जमीन खरेदी करत सरकारच्या मदतीने मैदानाची जागा विकत घेतली. तर याच मैदानाच्या जागेवर आता 300 करोड रुपयांचे प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे. त्याचसोबत अजून एका प्रकरणी पुण्यातील हवेली तालुका मधील केसनन येथे 23 एकर म्हातोबा देवस्थानाची देणगी म्हणून देण्यात आलेली जमीन विकली जाणार नव्हती. परंतु चंद्रकांत पाटील यांनी ती जमीन गैर असल्याचे घोषित केल्याचा आरोप सुद्धा लगावण्यात आला आहे. या कारणामुळे सरकारला 42 करोड रुपयांचे नुकसान झाले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.(हेही वाचा-आकाशवाणी केंद्रावर पुन्हा मराठी वर्तापत्र सुरू करा; सुनील तटकरे यांनी मांडला लोकसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा)
या सर्व प्रकारावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, दोन्ही प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे म्हटले आहे. 1885 मध्ये राज्यातील देणगी म्हणून देण्यात आलेल्या जमिनींसाठी एक रजिस्टर बनवण्यात आले होते. त्याचसोबत पहिल्यांदाच पुण्यातील बालेवाडी येथील जमिनीचे योग्य पद्धतीने मोजमाप करण्यात आले नाही. मात्र याबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर त्याचे पुन्हा एका अधिकाऱ्याकडून मोजमाप करण्यात आले होते असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.