Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, साता-यासह कोकणातही (Kokan) धुमशान घातलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली असून या भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पावसाने येथील नागरिकांची घरच्या घरं वाहून गेल्याने आपला संसार पुन्हा उभा करण्यासाठी येथील लोकांना खूप धीराने घ्यावे लागणार आहे. पावसाचा जोर या भागात जरी कमी झाला असला तरी उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने (Skymet) वर्तविली आहे. तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील (Vidarbha)  जळगाव, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

स्कायमेट चे ट्विट:

तसेच मुंबईत (Mumbai), पुण्यातही (Pune) आज मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने पूरपरिस्थिती भागाला काहीसा दिलासा मिळेल. तसेच जेथे पावसाचा जोर ओसरला असेल तेथील शेतकऱ्यांनी शेतातून जास्त पाणी काढून टाकावे. पाऊस नसलेल्या दिवशी कापूस, सोयाबीन, कडधान्ये आणि भाजीपाला मध्ये खुरपणी व खतांचा वापर भाज्यांचे नुकसान होण्यापासून वाचवावे.

हेही वाचा- कोल्हापूर मधील शाळांना 16 ऑगस्ट पर्यंत सुट्टी, पावसाचा जोर ओसरला तरी जनजीवन विस्कळीत

दरम्यान, पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने कोल्हापूर जिल्हा पुराच्या संकटातून हळूहळू सावरत आहे. पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 (NH-4) वरील वाहतूक गेल्या 8 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने आवश्यक वस्तूंच्या दळणवळणासाठी अवजड वाहनांसाठी हा महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे.