जुलै, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह मुंबईत मुसळधार पाऊस झाला. दरम्यान येत्या 3 तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यात गोंदिया (Gondia), गडचिरोली (Gadchiroli), भंडारा (Bhandara), चंद्रपूर (Chandrapur) आणि नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसंच चंद्रपूरातील ब्रम्हपुरी आणि नागपूरातील रामटेक, उमरेड येथे पावसाची पडण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान सध्या कोकणातही पाऊस बरसत असून पावसाचा जोर पुढील काही कायम राहणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाऊस विश्रांती घेणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पावसाची होणार नसल्याचे संकेत दिसून येत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
K S Hosalikar Tweet:
Nowcast warning dated 27.08.2020 Time of issue 07:20 hrs IST
Validity next 3 hours
Light to moderate rainfall very likely at few places over Gondia, Gadchiroli, Bhandara ,Chandrapur(Bramhapuri) and isolated places over Nagpur (Ramtek, Umred) districts of Vidarbha.@RMC_Nagpur pic.twitter.com/8QIRxG8l12
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 27, 2020
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं. परंतु, त्यानंतर हवा तसा पाऊस मुंबईत झाला नाही. त्यानंतर मात्र जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला.