Maharashtra Monsoon 2020| Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

Monsoon 2020 Updates:  मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मागील 3 दिवसांपासून धुव्वाधार पाऊस झाल्यानंतर आज (6 जुलै) वरूण राजा थोडी विश्रांती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान आयएमडी जीएफएस व डब्ल्यूआरएफ मॉडेलच्या माहितीनुसार, आज सोमवार, 6 जुलैला मुंबई (Mumbai) सह कोकणात (Konkan) अधून मधून जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. पावसाचा जोर ओरसला असला तरीही वार्‍याचा जोर मात्र 50-60 किमी प्रति तास असल्याने मच्छिमार्‍यांना समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Monsoon Updates: महाराष्ट्र- गोवा किनापट्टीवर 5-6 जुलैला 50-60 किमी प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

मुंबईमध्ये मागील विकेंडला जोरदार पाऊस बरसल्याने अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. दरम्यान समुद्रामध्येही भरती दरम्यान उंचच उंच लाटा पहायला मिळाल्या होत्या. पवई तलाव देखील ओसंडून वाहत असल्याचं चित्र होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना यंदा विनाकारण बाहेर पडू नका. पावसात भिजू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.  हे देखील वाचा- Mumbai Rain: मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो!

K S Hosalikar Tweet

मुंबई प्रमाणेच कोकणात देखील पावसामुळे जनसामान्य विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदीला पूर आल्याचं, झाडांची पडझड झाल्याची दृश्य पहायला मिळाली आहेत. गुजरात आणि नजिकच्या परिसरामध्ये मात्र पावसाचा जोर कायम आहे.