Maharashtra Legislature | (File Photo)

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी Maharashtra MLC Election 2021) आज (10 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. एकूण सहा जागांसाठी या निवडणुकी पार पडत आहेत. मात्र, चार जागा बिनविरोध झाल्याने आता केवळ दोनच जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा (Akola-Washim-Buldhana) आणि नागपूर (Nagpur) अशा दोन मतदारसंघात ही निवडणुक पार पडत आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शिवसेनेकडून गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात 'सामना' आहे. तर, नागपूर येथे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध अपक्ष मंगेश देशमुंख यांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या छोटू भोयर यांना काँग्रेसने तिकिट दिले. मात्र, ऐन वेळी निर्णय बदलत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.

नागपूर पक्षीय बलाबल- एकूण मतदार – 559, भाजपा – 316, काँग्रेस – 150, राष्ट्रवादी काँग्रेस – 24, शिवसेना – 28, बसप – 12, शेकाप – 5, स्थानिक गट – 7 अपक्ष – 17

अकोला-बुलढाणा-वाशीम विधान परिषद निवडणूक पक्षीय बलाबल- एकूण मतदार – 822, भाजपा – 245, काँग्रेस – 191, शिवसेना – 124, राष्ट्रवादी काँग्रेस – 91, वंचित – 86, एमआयएम – 7, प्रहार – 1, अपक्ष, स्थानिक आघाडी – 77.

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक (Maharashtra MLC Election 2021) कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबईतील 2, कोल्हापूर (Kolhapur), धुळे (Dhule ), नंदुरबार (Nandurbar), अकोला, (Akola ) बुलडाणा (Buldana), वाशिम (Washim) , नागपूर (Nagpur), या 6 जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानपरिषदेच्या 8 जागांचा कार्यकाळ अल्पावधीतच संपुष्ठात येत आहे. मात्र, सोलापूर आणि अहमदनगर या दोन जागा वगळून इतर जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला)

विधानपरिषदील कार्यकाळ संपत असलेले आमदार (स्थानिक स्वराज्य संस्था)

  • मंबई- रामदास कदम आणि भाई जगताप
  • कोल्हापूर- सतेज पाटील
  • धुळे-नंदूरबार- अमरिश पटेल
  • नागपूर- गिरीश व्यास
  • अकोला-बुलडाणा-वाशिमम- गोपालकिशन बाजोरिया

एकूण सहा विधानपरिषद जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी 4 जागा बिनविरध झाल्या आहेत. उर्वरीत 2 जागांसाठी आज निवडणूक पार पडत आहे.