महाराष्ट्रातील भाजपचे आमदार, राज्यसभेचे खासदार  महाविकास आघाडीच्या संपर्कात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारमुळे जनतेला काहीसा धक्काच मिळाला आहे, कारण 25 वर्ष जुन्या भाजपसोबत शिवसेना पक्षाने युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करुन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तर सत्ताधारी आघाडीच्या काही सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ डझनभर भाजपचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तर विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून बाहेर आलेल्या आमदारांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मात्र काही आमदार यामुळे नाखुश असल्याचे ही बोलले जात आहे. तर भाजपच्या राज्यसभेचे खासदार आणि अन्य नेत्यांनी विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

तर महाविकास आघाडीसोबत भाजपचे आमदार आणि खासदार संपर्कात असून त्यांनी पोटनिवडणूकीतून सुद्धा मागे येण्याचा विचार केला आहे. यासाठी त्यांना पक्षप्रमुखांकडून हिरवा कंदील कधी दाखवला जाईल याची प्रतिक्षा करत आहेत. तर नागपूरात पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन अधिक गती मिळेल असे एका नेत्याने म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपची नेतेमंडळी काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची अधिक शक्यता आहे. तर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील संबंधित आघाडीच्या भागीदारांचा पराभव करून विजय मिळविला होता. त्यामुळे त्यांचे असे मत आहे की, जर तीन पक्षाच्या युतीने त्यांचे मत दिले तर पोटनिवडणूक जिंकण्याची त्यांना चांगली संधी असेल.(400 शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने फसवणुकीची भावना)

 राज्यात ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 169 आमदारांनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र भाजपने त्यावेळी विधानसभेच्या सभागृहाचा त्याग करत बाहेर पडले होते. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पाठोपाठच गोव्यात सुद्धा भाजपचे सरकार पाडून हळूहळू संपूर्ण देश भाजपमुक्त करू असाही इशारा राऊत यांनी दिला. गोव्याच्या सद्य स्थितीतील सरकारचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या सोबत मिळून आता गोव्याच्या राजकारणाला नवीन वळण देण्याचे आम्ही योजत आहोत. लवकरच आपल्याला एक राजकीय चमत्कार पाहायला मिळणार आहे असे राऊत यांनी सांगितले होते.