महाराष्ट्रातील मुली हरवल्याचा (Missing Girls) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च 2023 मध्ये सुमारे 2,200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली, याचा अर्थ सरासरी दररोज 70 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. विशेषत: 18 ते 25 वयोगटातील मुली बेपत्ता झाल्या आहेत. एकट्या फेब्रुवारी महिन्यात 1,810 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मार्चमध्ये हा आकडा 390 ने वाढला. कायद्याने अल्पवयीन मुलांची ओळख उघड करता येत नाही, त्यामुळे हा डेटा पोलिसांच्या वेबसाइटवर अपलोड केला जात नाही. या आकडेवारीत अपहरण झालेल्या मुलींचा समावेश नाही. Free Press Journal ने याबाबत वृत्त दिले आहे.
याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘हे चिंताजनक आहे. पोलिसांच्या बेपत्ता व्यक्ती कक्षाने त्याची कारणे शोधण्याची गरज आहे.’ तसेच चाकणकर यांनी याबाबत त्वरित तपास पथक सुरु करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
शहरांपेक्षा ग्रामीण भागात मुली हरवण्याचे प्रमाण अधिक आहे. मार्च महिन्यात पुणे 228, नाशिक 161, कोल्हापूर जिल्ह्यात 114, ठाणे 133, अहमदनगर 101, जळगाव 81, सांगली 82, आणि यवतमाळ 74 ही आकडेवारी राज्यात सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी आकडेवारी हिंगोली 3, सिंधुदुर्ग 3, रत्नागिरी 12, नंदुरबार 14, भंडारा 16 अशी आहे. (हेही वाचा: Satara Sexual Crime: तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीला विकले, लॉजवर नेऊन अत्याचार; सातारा येथील खळबळजन घटना)
राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.@Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog@maharashtra_hmo @DGPMaharashtra pic.twitter.com/vr2QXqsXbX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2023
हरवलेल्या मुली (2023)-
जानेवारी - 1600
फेब्रुवारी - 1810
मार्च – 2200
जानेवारी 2023 ते मार्च 2023 या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता, राज्यातील 5,610 मुली बेपत्ता झाल्याचे स्पष्ट आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचे आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचर स्पष्ट झाले आहे. 2020 पासून देशात हरवलेल्या व्यक्तींच्या संख्येबाबत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.