Maharashtra: 37 कोटी रुपये हडपण्यासाठी व्यक्तीला कोब्रा सापाचा धाक दाखवत केले ठार, बीमा कंपनीत आरोपीने केला मृत्यूचा दावा
King Cobra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील अहमदनगर येथे एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका 54 वर्षीय व्यक्तीने स्वत:ची बीम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा कट रचला. ऐवढेच नव्हे तर त्याने निराधार व्यक्तीला कोब्राचा धाक दाखवत ठार केले आहे. त्याला अमेरिकेतील इंन्शुरन्स कंपनीत सुरु असलेल्या पॉलिसीचे 37.5 कोटी रुपये हवे होते. परंतु त्याने रचलेला कट अशावेळी उघड झाला जेव्हा बीमा कंपनीने याबद्दल पोलिसांना तपास करण्यास सांगितले. पोलिसांनी कारवाई करत आरोपसह त्याचा 4 साथीदारांना अटक केली आहे.

पोलिसांच्या मते, प्रभाकर भीमाजी वाघचौरे नावाचा व्यक्ती 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. तो जानेवारी महिन्यात भारतात परतल्यानंतर महाराष्ट्रातील अहमनगर येथील राजूर गावात राहू लागला होता. 22 एप्रिलला राजूर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयातून वाघचौरे याच्या मृत्यूचा रिपोर्ट मिळाला होता.(Thane: वीज बील कमी करुन देण्याच्या नावाखाली 25 ग्राहकांची 19.6 लाख रुपयांची फसवणूक; 2 जण अटकेत)

जेव्हा एक पोलीस कॉन्स्टेंबल रुग्णालयात गेला तेव्हा एका व्यक्तीने स्वत:ला वाघचौरे याचा नातेवाईक असल्याचे सांगितले. प्रवीण नावाच्या या व्यक्तीने मृतदेहाची ओळख ही वाघचौरे असल्याचे सांगितले. राजूर मध्ये राहणारा हर्षद लाहमगे नावाच्या एका व्यक्तीने सुद्धा मृतदेह वाघचौरे याचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्राथमिक वैद्यकिय रिपोर्ट मिळवत शव अंतिम संस्कारासाठी प्रवीण याच्या ताब्यात दिले. या रिपोर्टमध्ये साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.

तर वाघचौरे याच्या जीवन बीमाचा तपास करत असलेल्या बीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा अहमदनगर पोलिसांना संपर्क करुन त्याच्या मृत्यू बद्दल अधिक माहिती मागितली असता सत्य घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी तपास सुरु करत राजूरमध्ये वाघचौरे याचे घर गाठले. एका शेजारच्या व्यक्तीने त्याला साप चावल्याने मृत्यू झाल्याचे ऐकलेच नव्हते. मात्र घटनास्थळी एक रुग्णवाहिका येत असल्याचे त्याने पाहिले होते. जेव्हा लाहमागे याला संपर्क केला असता तेव्हा कळले की, कोविडमुळे त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी त्या मृत व्यक्तीच्या एकतरी नातेवाईकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही झाले नाही.पोलिसांनी अशातच वाघचौरे याचे कॉल रेकॉर्ड दाखवण्यास सुरुवात केली. त्यावरुन कळले की, तो जीवंत नव्हे तर त्याने स्वत:ला प्रवीणच्या रुपात दर्शवले होते. त्यानंतर लगेच वाघचौरे याला अटक करण्यात आली.

अहमदनगर एसपी मनोज पाटील यांनी सोमवारी असे म्हटले की, बीमा तपासकर्त्यांनी वाघचौरे याच्या मृत्यूच्या दाव्यावर सखोल तपास सुरु केला. कारण त्याने 2017 मध्ये जीवन बीमा दाव्यासाठी आपल्या पत्नीच्या मृत्यूचा दावा करत फसवणूक केली होती. त्याची पत्नी जीवंत आहे. तपासातून असे ही कळले की, त्याने एका सर्पमित्राकडून कोब्रा खरेदी केला होता.

आरोपींना वाघचौरे याच्या सारखा दिसणारा एक निराधार व्यक्ती भेटला. त्याला कोब्राचा धाक दाखवत मारुन टाकले. वाघचौरे याने स्वत:ला प्रवीणचा नातेवाईक सांगून आणि साप चावल्याने स्वत:चा मृत्यू झाल्याची सुचना पोलिसांना दिली होती. पोलिसांनी आता मृत्य व्यक्तीची ओळख नवनाथ यशवंत आनाप पटवली आहे. जो त्याच परिसरात राहत होता.

पोलिसांना तपासात कळले की, हत्येच्या काही दिवसांपूर्वी वाघचौरे जिल्ह्यातील एका नव्या घरात राहू लागला होता. 22 एप्रिलला आरोपीने आनापला जबरदस्ती एका अज्ञात ठिकाणी घेऊन जात त्याच्यावर साप सोडला. साप चावल्याने मृत्यू झालेल्या मृतदेहाला वाघचौरे घरी घेऊन जात तेथे एका रुग्णवाहिकेला सुद्धा बोलावले.