Nagpur: विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फेसबूक फ्रेन्डविरोधात गुन्हा दाखल, नागपूर येथील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

महिलांवर होणारे अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना नागपूर (Nagpur) येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी तिच्या फेसबूक फ्रेन्डविरोधात (Facebook Friend) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात (Ajni Police Station) पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांच्यात 2017 मध्ये फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये पीडित महिलेने अन्य दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. ज्यामुळे तिने आरोपीशी बोलणे बंद केले. दरम्यान, गुरुवारी आरोपी हा पीडित महिलेशी लग्न करण्यासाठी तिच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला, अशी तक्रार पीडिताने पोलिसांत दिली आहे. यासंदर्भात अजनी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Ahmedabad: ऑनलाईन अभ्यासादरम्यान स्वत:चे न्यूड फोटो आणि अश्लील व्हिडिओ केले शेअर, अल्पवयीन मुलीच्या कृत्यामुळे पालकांना हृदयविकाराचा झटका

फेसबूकद्वारे तरूणींशी ओळख करून त्यांना प्रेमात जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार किवा त्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.