Maharashtra State Lottery Results: महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये दर आठवड्याला 6 साप्ताहिक आणि 4 मिनी लॉटरीची सोडत जाहीर केली जाते. त्यापैकी दर गुरूवारी आकर्षक पुष्कराज (Akarshak Pushkaraj), महा. गजलक्ष्मी गुरु (Maha. Gajalakshmi Guru) , गणेशलक्ष्मी गौरव (Ganesha Lakshmi Gaurav) आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी (Maha. Sahyadri Deepakshmi) यांची सोडत आड 8 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर केली जाते. महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
- त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
- यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
- पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
- या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
यामध्ये आकर्षक पुष्कराजचे पहिले सामायिक बक्षीस 7 लाखाचे आहे. रोज संध्याकाळी 4.15 नंतर लॉटरी निकाल जाहीर केले जातात. तर महा. गजलक्ष्मी गुरु चे 10 हजारांची 5 बक्षीसं, गणेशलक्ष्मी गौरव आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी यांची प्रत्येकी 10 हजारांची बक्षीसं आहेत. आज एकूण 7 हजार 727 बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत. आकर्षक पुष्कराजची 5,250 बक्षीसं आहेत. महा. गजलक्ष्मी गुरुची 1,175 बक्षीसं आहेत. गणेशलक्ष्मी गौरवची 861 बक्षीसं आहेत. महा. सह्याद्री दीपलक्ष्मीची 4, 41 बक्षीसं आहेत.
विजेत्याला रक्कम मिळवण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. एक फॉर्म असतो यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, पॅनकार्ड नंबर, आधारकार्ड नंबर ही माहिती भरणं आवश्यक असते. सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर कागदपत्रांसह देणं आवश्यक आहेत.