Maharashtra Lottery GajLaxmi Budh Results: महाराष्ट्र गजलक्ष्मी बुध साप्ताहिक सोडतीचा निकाल आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर होणार जाहीर
लॉटरी/ प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: Getty Images)

Maharashtra Lottery Results 2019: झटपट पैसा मिळणे हे स्वप्न आपल्यापैकी अनेकांचे असते. केवळ तुमच्या नशिबाच्या जोरावर मिळणारी ही श्रीमंती म्हणजे 'लॉटरी'. म्हणूनच महाराष्ट्र राज्य लॉटरीने समाजातील मटका व जुगार ह्या व्यसनांना प्रतिबंध घालून, त्यातून होणारी जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी, राज्याच्या वित्त‍ विभागाने ह्या लॉटरीची सुरुवात केली. 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत लॉटरीचे तिकिट काढून लखपती, करोडपती झालेले अनेक लोक आपल्याला पाहायला मिळाले आहे. अशा लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार असणार आहे. कारण महाराष्ट्र गजलक्ष्मी बुध साप्ताहिक सोडतीचा निकाल लागणार आहे. आज संध्याकाळी 4.45 मिनिटांनी lottery.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल.

महाराष्ट्र गजलक्ष्मी सोडत ही साप्ताहिक सोडत असून ती रोज जाहीर केली जाते. आज जाहीर होणा-या महाराष्ट्र गजलक्ष्मी सोडतीची तिकिट हे एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी घेतले जाते. हे तिकिट केवळ 10 रुपयांना मिळते. Maharashtra Lottery GaneshLaxmi Dhan Results: 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' चा निकाल आज संध्याकाळी 5 वाजता lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर

आजच्या गजलक्ष्मी बुध सोडतीतील भाग्यवान विजेत्याला 10,000 रुपये मिळणार आहे. थोडक्यात 10 रुपयांमधून हा भाग्यवान विजेता 10 हजारांचा टप्पा गाठणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये या लॉटरीविषयी उत्सुकता वाढली आहे.

या लॉटरीमध्ये पहिल्या 4 विजेत्यांना अनुक्रमे 10,000, 1,000, 500 आणि 200 रुपये इतकी धनराशी मिळते. यात पहिल्या क्रमांकासाठी केवळ 1, दुस-यासाठी 18, तिस-या क्रमांकासाठी 29 आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 29 भाग्यवान विजेते निवडण्यात येतात.