Maharashtra Lottery Results: महाराष्ट्र राज्य लॉटरीची (Maharashtra Lottery) सुरूवात 12 एप्रिल 1969 दिवशी झाली आहे. त्यानंतर आता नियमित लॉटरीची सोडत जाहीर केली जाते. काही लॉटरी नियमित तर काही दर आठवड्याला जाहीर केल्या जातात. दर शुक्रवारी गणेशलक्षमी धन लॉटरी (Maharashtra Lottery GaneshLaxmi Dhan) जाहीर केली जाते. आज संध्याकाळी 5 च्या सुमारास या लॉटरीचा ड्रॉ जाहीर केला जातो. याकरिता lottery.maharashtra.gov.in ला भेट द्या आणि निकाल पहा. ही लॉटरी महाराष्ट्र राज्यात कायदेशीर नियमांनुसार मान्यताप्राप्त आहे. नकली लॉटरीच्या जाळ्यात अडकून सामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारकडून ही लॉटरी जाहीर करण्यात येते.
महाराष्ट्र लॉटरीची विजेती रक्कम नेमकी किती?
शुक्रवारी जाहीर होणार्या लॉटरीचं नाव गणेशलक्ष्मी धन आहे. त्याच्यामध्ये अनेक विजेते असतात. महाराष्ट्र लॉटरीच्या पहिल्या विजेत्यास 10 हजार रूपये, दुसर्या विजेत्यास 5 हजार रूपये, तिसर्या विजेत्यास 2 हजार तर चौथ्या विजेत्यास एक हजार आणि पाचव्या विजेत्यास 400 रूपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. लॉटरीमध्ये 75 रॅन्डम नंबर निवडले जातात.
महाराष्ट्र राज्य लॉटरीचं आठवड्याचं वेळापत्रक
लॉटरीमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. बंपर लॉटरी जिंकण्याची अनेकांची इच्छा असते त्यासाठी नियमित काही लोक आपलं नशीब आजमावत असतात. लॉटरी जिंकल्यानंतरही त्याचा दावा करताना तुमचं तिकीट उत्तम स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे. खराब झालेलं, फाटलेलं तिकीट ग्राह्य धरले जात नाही. तसेच विजेत्याला आयडी कार्ड सोबत घेऊन जाणं, त्याच्यासोबत पासपोर्ट साईज फोटो लावणं आवश्यक आहे.