Maharashtra Lok Sabha Election Results 2019:  प्रीतम मुंडे - पंकजा मुंडे यांनी फुगडी घालून सेलिब्रेट केला लोकसभा निवडणूक 2019 चा 'बीड' लोकसभा मतदार संघातील विजय
Munde family (Photo Credits: Twitter)

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची ओळख असलेला बीड मतदारसंघामध्ये प्रीतम मुंडे यांनी विजय मिळवत पुन्हा स्थानिकांचा विश्वास संपादीत केला आहे. गोपिनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची मुलगी प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळेस हा विजय भावनिक लाट असल्याचं म्हटलं होतं. मात्र यंदा प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. Lok Sabha Election Results 2019: बीड मतदारसंघात भाजपाची आघाडी, पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या आठवणीत केलं भावनिक ट्विट

प्रीतम मुंडे यांचा विजय त्यांची बहीण आणि केंद्रीय मंत्री पंकजा मुंडे यांनी सेलिब्रेट केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक खास व्हिडिओ शेअर करत सेलिब्रेशन शेअर केलं आहे." हॅलो बाबा, तुमचाच बाले किल्ला, बीड जिल्हा बीड जिल्हा " अशी कॅप्शन दिली आहे.

देशासह महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल एनडीएच्या बाजुने लागले आहेत.