Lok Sabha Election Results 2019: बीड मतदारसंघात भाजपाची आघाडी, पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या आठवणीत केलं भावनिक ट्विट
Pankaja, Gopinath Munde | (Photo courtesy: archived, edited, representative image)

लोकसभा निवडणुक 2019 (loksabha elections 2019) चे निकालसत्र सुरु असताना प्राथमिक कल पाहता भाजपाची जोरदार आघाडी समोर येत आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी एक असलेल्या बीड मतदारसंघात (Beed Loksabha Constituency)  यंदा भाजपाच्या प्रीतम मुंडे (Pritam Munde) विरुद्ध आघाडीच्या बजरंग सोनावणे (Bajranag Sonavane) यांच्यात लढत पाहायला मिळाली, मताधिक्याच्या आधारे प्रीतम मुंडे या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड मतदारसंघ हा 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या नेतृत्वाखालील विभाग म्हणून प्रसिद्ध होता मात्र त्यांच्या निधनानंतर सर्व सूत्रे त्यांची कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अतिशय कणखरपणे हाती घेतली होती. आज निकालाच्या दिवशी मात्र त्यांनी भावनिक होऊन वडिलांच्या आठवणीत एक ट्विट केले आहे. TV9  चॅनेलला दिलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी वडिलांबरोबरची आठवण शेअर करत या ट्विटचा खुलासा केला आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट मध्ये लहानपणी फोनवर बोलत असतानाच एक फोटो टाकत वर हॅलो बाबा असे लिहिले आहे याविषयी सांगताना त्या म्हणतात की, "2014 साली झालेल्या निवडणुकीच्या निकाला दरम्यान देखील मतांची चढाओढ असल्याने मुंडे साहेब हरण्याची चर्चा होत होती मात्र त्यावेळी मिळालेल्या विजयकाने बीड वरील वर्चस्व सिद्ध झाले होते, त्यावेळी या निवडणुकीची प्रचारसूत्रे मी हाताळल्याने मुंडे साहेबांनी माझ्या कानात धन्यवाद बेटा असे म्हंटले होते त्या प्रसंगाची आठवण होऊन हे ट्विट करावेसे वाटले". बीड मतदानात सध्या प्रीतम मुंडेंची आघाडी असल्याची समोर येत आहे याबद्दल आनंद व्यक्त करत हा साहेबांचा व मतदार राज्याचा आशीर्वाद असल्याचे देखील पंकजा यांनी सांगितले.

पंकजा मुंडे ट्विट

देशभरात यंदा नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात जोरदार प्रचार झाला होता मात्र लोकांनी त्याकडे लक्ष न देता मोदींच्या विकासाला आपल्या विश्वासाची जोड देत पुन्हा एकदा भाजपलाच निवडून देण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे यंदा कोणत्याच पक्षाची स्पर्धा बीड मध्ये तरी जाणवली नाही असे त्या पंकजा म्हणाल्या.जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

प्रीतम यांचा विजय जवळपास निश्चित असल्यामुळे बीड वासियांनी अगोदरच आनंद साजरा करायला सुरवात केली आहे. निकाल घोषित झाल्यावर मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन व मतदारांसाठी आभार दौरा करून सेलिब्रेशन पार पडेल असे त्यांनी सांगितले. यंदा बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे त्यामुळे दुष्काळ हटविण्यासाठी योग्य तरतूद करून सेलिब्रेशन साजरे करण्याचा विचार पंकजा मुंडे यांनी मुलाखतीत बोलताना व्यक्त केला.