Maharashtra: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी राज्यातील मंदिरे पुन्हा एकदा सुरु करण्यावरुन महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सवाल केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मंदिरांवरील प्रतिबंध हटवण्यासाठी जर आंदोलन केले जात असेल तर त्यामध्ये मी सुद्धा समर्थन देईल. त्याचसोबत तुम्ही राज्यात दारुची दुकाने सुरु करु शकता पण मंदिरे नाही असे ही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.(विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करण्याचे राजेश टोपे यांचे आवाहन)
अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी गावात शनिवारी हजारे यांनी असे म्हटले की, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात त्यांनी काही लोकांच्या एका प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. त्यांनी असे ही म्हटले की, राज्य सरकार मंदिरे का सुरु करत नाही आहे? लोकांसाठी मंदिर सुरु करण्यासाठी राज्य सरकारला त्यात काय धोका दिसत आहे? यामागे जर कोविडचे कारण असेल तर दारुच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या रांगा का लागतात.(Night Curfew in Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा रात्रीची संचारबंदी? पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे)
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याने काही ठिकाणी निर्बंध शिथील केले आहेत. त्याचसोबत दोन्ही डोस झालेल्यांना रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची मुभा दिली जात आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढेल या भीतीने मंदिरे अद्याप पुन्हा सुरु केली जात नाही आहेत. या व्यतिरिक्त कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र तरीही भाजप कडून ही मंदिरे सुरु करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे.