Ambadas Danve: अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड
Ambadas Danve |

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) आमदार अंबादास दानवे यांची निवड विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल विधान परिषद अध्यक्षांना याबाबत पत्र लिहीले होते. शिवसेनेच्या वतीने अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पक्षातूनही दानवे यांच्या नावाला पसंती होती. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे सत्तासमीकरणेही मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. सहाजीक. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्याही भूमिका आणि जबाबदाऱ्या बदलल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झालेत. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले आहेत.

शिवसेना आमदार मनीषा कायंदे, सचिन अहिर, अंबादास दानवे, विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्या एका शिष्टमंडळाने विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागच्याच महिन्यात भेट घेतली होती. या भेटीदरम्यान विरोधी पक्षनेतेपद आणि मुख्य सचेतक या पदाबाबत एक पत्र या शिष्टमंडळाने विधानपरिषदेच्या उपसभापतींना दिले होते. (हेही वाचा,  Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दादा भुसे, अब्दुल सत्तार ते राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांचाही समावेश .)

विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल (8 जुलै पर्यंत)

विधानपरिषद एकूण सदस्य संख्या- 78

भाजप-24

शिवसेना-12

राष्ट्रवादी काँग्रेस-10

काँग्रेस- 10

राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही इतिहासात असे विचीत्र उदाहरण पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. एकाच पक्षाचे मुख्यमंत्री आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते असे विरोधाभासात्मक चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले असून, एकनाथ शिंदे हे शिंदे गटाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री झाले आहेत.