राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते रामराजे निबांळकर भाजप पक्षाच्या वाटेवर?
रामराजे नाईक निंबाळकर (फोटो सौजन्य-फेसबुक)

आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी राजकीय पक्षांतर सुरु झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी (NCP)  पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेते सभापती रामराजे निबांळकर (Ramraje Naik Nimbalkar) भाजप (BJP) पक्षाच्या वाटेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या पावलावर पाऊल टाकत भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निबांळकर यांनी जर भाजपात प्रवेश करण्यामागे त्यांचे सातरामधील खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत असलेले वाद कारणीभुत ठरतील असे बोलले जात आहे. निंबाळकर हे साताऱ्या जिल्ह्यातील फलटन तालुक्याच्या एका शाही परिवारीत सदस्य आहेत. तर उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराड यांचे वंशज आहेत.

निंबाळकर यांनी पक्ष बदलल्यास ते विधान परिषदेच्या सभापती पदावर कायम राहतील अशी अपेक्षा केली जात आहे. तर भोसले यांचे छोटे भाऊ शिवेंद्रराजे भोसले यांनीसुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. शिवेंद्रराजे पश्चिम महाराष्ट्रातील जावळी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.(बार्शी मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांचे शिवसेना प्रवेशाचे संकेत)

उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यामधील वाद मिटवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता. तरीही सार्वजनिक मंचावर हे दोघे जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून आले. आगामी विधानसभा येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर विखे-पाटील यांनी जून महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना गृहमंत्री हे खाते दिल्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या भाजप पक्षात प्रवेश केला आहे.