Coronavirus (Photo Credits-Twitter)

महाष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच आरोग्य तज्ज्ञांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार होती. परंतु, कोरोना लसींच्या कमतरतेमुळे या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात लस नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. लसींच्या कमतरतेमुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे म्हणजे, राज्यात दोन तृतीयांश नागरिकांना लस दिल्यानंतर कोरोनावर नियंत्रण आणले जाऊ शकते. परंतु, राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, महाराष्ट्रातील 9 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 जणांनाच लस देण्यात आल्या आहेत, ज्या खूपच कमी आहेत. जर आपण लसीकरणाची गती वाढवली नाही तर, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. सध्या काही लोक बेफिकीर झाले आहेत. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला चालना मिळाली आहे, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Corona Vaccine Price: कोविशिल्ड लसीच्या किंमतीत 100 रुपयांची कपात, राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात आज 63 हजार 309 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर नव्या 61 हजार 181 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 37 लाख 30 हजार 729 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.4% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.