Maharashtra HSC Results Date: महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल येत्या आठवड्याभरात mahresult.nic.in लागण्याची शक्यता
HSC Results 2019 (Archived, edited, representative images)

Maharashtra HSC Results 2019 Date: मे महिन्याचा शेवटचा टप्पा जसा जवळ येतो तसतसं महाराष्ट्रातील 10 वी आणि 12 वीच्या विद्य्यार्थ्यांना निकालाचे वेध लागतात. यंदा लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक निकाल यामुळे राज्यातील दहावी (SSC), बारावीचे (HSC) निकाल लांबणीवर पडण्याची भीती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होती. मात्र बोर्डाने यंदा वेळेत निकाल लावले जातील असा दिलासा दिला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात एचएससी म्हणजे बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

तज्ञांच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये यंदा बारावीचा निकाल लागू शकतो. अद्याप शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र तज्ञांच्या माहितीनुसार यंदा 27, 28 मे दिवशी बारावीचा निकाल लागू शकतो. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखांबाबत माहिती देणारे मेसेज फॉर्वर्ड केले जात आहेत मात्र अजूनही मंडळाने अंतिम तारीख घोषित केलेली नाही.

महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स

  • mahresults.nic.in,
  • maharashtraeducation.com, results.mkcl.org,
  • mahahsscboard.maharashtra.gov.in,
  • mahahsscboard.inमागील वर्षी बारावीचा निकाल 30 मे 2018 दिवशी लागला होता. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च  दरम्यान पार पडली आहे. बारावी पाठोपाठ दहावीचे निकाल जून 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.