महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा (MSBSHSE SSC Exam 2023) आजपासून (मंगळवार, 21 फेब्रुवारी) सुरु होत आहेत. ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना 10 मिनीटांचा अतिरिक्त वेळही देण्यात येणार आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या लिखानाच्या सवयीमध्ये मोठा खंड पडला आहे. त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये उत्तरे लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती. ज्याला मान्यता देण्यात आली. मात्र, या आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 10 मिनिटे आगोदर मळत असे. तो आता उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा दिवसाच्या दोन सत्रांमध्ये पार पडते आहे. पहिल्या सत्रासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजता केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. पहिल्या सत्रातील पेपर सकाळी 11.00 वाजता सुरु होईल. तर दुसऱ्या सत्रातील पेपरसाठी विद्यार्थ्यांनी दुपारी 2.30 वाजता परीक्षा केंद्रांवर पोहोचणे आवश्यक आहे. दुसऱ्या सत्रातील पेपर दुपारी 3.00 वाजता सुरु होईल. (हेही वाचा, Non Teaching Staff Strike: बोर्ड परीक्षांच्या तोंडावर राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप)
दरम्यान, राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना गणित, लेखा, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आदी विषयांच्या पेपरसाठी कॅल्क्युलेटर वापरता येणार आहे. परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना उत्तरांचे अनुकरण म्हणजेच कॉपी करता येणार नाही. त्यांनी ती करु नये यासाठी शिक्षण मंडळाने भरारी पथके नेमली आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी पत्रकार परिषदेत माहिती देताना सोमावारी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे आठ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 14,57,293 विद्यार्थ्यांमध्ये 7,92,780 मुले तर 6,64,441 मुली आहेत. 10,388 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून आठ विभागातील 3195 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.