HSC 2020 Exams | Representational Image (Photo Credits: PTI)

Maharashtra HSC Board Exams 2020 Important instructions:  महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेला (Maharashtra HSC Board Exams) आजपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान आजपासून सुरू होणार्‍या या परीक्षेला सुमारे 15 लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका आणि गुणपद्धतीमध्येही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान अनेकांच्या शैक्षणिक टप्प्यामध्ये 12 वीची परीक्षा ही महत्त्वाची असते. यंदा महाराष्ट्र बोर्डाची HSC परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत होईल. परीक्षेदरम्यान गैरप्रकार, कॉपी रोखण्यासाठी मंडळातर्फे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व जिल्ह्य़ात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती देखील सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे यंदा तुम्ही देखील महाराष्ट्र बोर्डाकडून घेतल्या जाणार्‍या HSC परीक्षेला सामोरं जाणार असाल तर पुढील महिनाभर चालणारी ही परीक्षा टेंशन फ्री देण्यासाठी या काही महत्त्वाच्या टीप्स, बोर्डाचे नियम 12वीच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामुळे परीक्षा केंद्रामध्ये आयत्या वेळेस होणारी धांदल कमी करण्यास मदत होईल. Maharashtra Board HSC Exam 2020 Timetable: 12 वीची परीक्षा 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार, PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक

12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास टीप्स

  • परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच पर्यवेक्षकांनाही ही बंदी लागू आहे. विद्यार्थांना फोन बाहेर ठेवून परिक्षा केंद्रातील वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल.
  • विद्यार्थ्यांना मोबाइलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही.
  • गणित, बुक किपिंग, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विषयांच्या परीक्षेला कॅल्क्युलेटर घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्याशिवाय स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशा अन्य कोणत्याही वस्तू परीक्षा देणार आहात त्या वर्गामध्ये नेता येणार नाही.
  • विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रातील वर्गामध्ये अर्धा तास आधी पोहचणं आवश्यक आहे. सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेआधी म्हणजे 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अकरा वाजेपर्यंतच परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असून अकरा वाजल्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उशिरा येण्याच्या कारणाची केंद्रप्रमुख पडताळणी करून प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतील.  खुशखबर! दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई मेट्रो सुरु करणार 'ट्रॅव्हल हेल्पडेस्क' जेथे पाल्यासह पालकांना मिळणार 'ही' विशेष सुविधा
  • हॉलतिकिटा शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

    त्यामुळे प्रत्येक विषयाच्या परीक्षेपूर्वी हॉलतिकीट घेऊन जा.

  • विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षण मंडळाकडून 24X7 हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

यंदा बारावीची परीक्षेला सामोरे जाणार्‍यांची संख्या 15 लाख 5 हजार 27 इतकी आहे. दरम्यान यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर आजपासून परीक्षेला सुरूवात होणार आहे. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल अशा चार विविध शाखांमधून विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.