सातारा जिल्हयातील वाई विधानसभा मतदारसंघात महाबळेश्वर पश्चिम तालुक्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शेलार यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुका प्रमुख संजय शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर पश्चिम तालुक्यातील एकूण 6 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला आहे.
Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021 Live Update: महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यऱ्यांना आगामी काळात ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी कारभार कसा चालवावा आणि सर्व शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी प्रशिक्षण घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केले आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा दावा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
गोंदिया जिल्ह्यात 189 जागांपैकी 181 जागांची मतमोजणी झाली असून यात भाजप आघाडीवर आहेत. भाजप 68 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 56 जागांवर विजयी झाले आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राज्यात भाजपचे 6000 सरपंच होणार असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये 1907 गावांमध्ये भाजप विजयी झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
सांगली जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये काँग्रेस पॅनल 49, राष्ट्रवादी पॅनल 34, स्थानिक आघाडी 34, भाजपा पॅनल 20, शिवसेना पॅनल 15 जागा मिळाल्या आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
गावगाड्यात महाविकासाआघाडी बहुमतात आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीचे बळ म्हणत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मोठे यश आल्याचे पाहायला मिळत आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
राज्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास 1007 ग्रामपंचायतींवर शिवसेनने भगवाड फडकवल्याचे पाहायला मिळत आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठे यश. लवकरच सर्व ग्रामपंचायतींची आकडेवारी येईल. तेव्हा भाजप या आकडेवारीत कोठे आहे हे पुढे येईल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
ग्रामपंचायत निवडणुकीत 14 हजारापैकी 6 हजार गावांत भाजप अव्वल ठरल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी केला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थक उमेदवारांचा विजय झाला आहे, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन ! गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा ! खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. @NCPspeaks समर्थक उमेदवारांचा विजय झाला आहे, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन ! गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा ! खूप खूप शुभेच्छा !! pic.twitter.com/cJGbJMOEQX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2021
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का बसला आहे. भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारड मध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. येथे शिवसेनेचे 17 पैकी 16 सदस्य विजयी झाले आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
चंद्रकांत पाटलांनंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांना धक्का बसला आहे. भोदरदन तालुक्यातील प्रमुख गावात महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवलं आहे. पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत, सिपोरा बाजार ग्रामपंचायत, वालसावंगी ग्रामपंचायत भाजपकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. तसेच पारध ग्रामपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीवर शिवसेना शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. 63 पैकी 42 जागा शिवसेनेला मिळाल्या असून 18 जागेवर राष्ट्रवादी पक्षाचा विजय झाला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
पाथरवाला ग्रामपंचायतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. या निवडणुकीत सर्वच्या सर्व 13 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
राज्यातील जनतेचा विश्वास महाविकासआघाडीवरआहे. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीला यश मिळत असल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत अण्णा हजारे समर्थक पॅनलचा विजय झाला आहे. या ठिकाणी 9 पैकी 5 जागा मिळवत हजारे गटाचा विजय झाला आहे. या ठिकाणी बिनविरोध झालेल्या 2 जागाही हजारे समर्थकांच्याच आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
परळी तालुक्यात धनंजय मुंडे गटाच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 6 पैकी 6 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांच्या भाजप गटाला मात्र फारशे यश हाती आलेच नाही.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
तासगाव तालुक्यात कवठेएकंद ग्रामपंचायतीत भाजप आणि शेकापने आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला आहे. या ठिकाणी भाजप-शेकापला 13 तर राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यतील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेनेने बहुमताने विजय मिळवला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. खानापूर हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव आहे. या ठिकाणी शिवसेनेला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र आले आहे. तीन ठिकाणी शिवसेना उमेवदवार विजयी झालेआहेत. या गावातील आणखी 10 जागांचे निकाल येणे बागी आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
शिवसेना जिंकत असलेल्या ग्रामपंयाचती म्हणजे ही केवळ सुरुवात आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
घोडा तांडा ग्रामपंचायतीत काँग्रेसला एकहाती विजय मिळाला आहे. काँग्रेसकडून सर्वच्या सर्व जागा विजयी झाल्या आहेत. इथे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
कराड येथील काले ग्रामपंचायत निवडणुकीत पृथ्विराज चव्हाण गटाला धक्का. या ठिकाणी भाजपचे वर्चस्व.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत भास्कर पेरे पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. पेरे पाटील यांची कन्या अनुराधा यांच्या कन्या पराभूत झाल्या आहेत. या गावाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
दक्षिण सोलापूर येथून भाजपच्या सुभाष देशमख गटाला तांदूळवाडी ग्रामपंयात निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील 4 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे गटाला धक्का बसला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत पोपटराव पवार यांचे पॅनल विजयी झाले आहे. या गावात 30 वर्षानंतर निवडणूक लागली होती. या गावच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
माळशिरस तालुक्यातील येळीव, विजयवाडी, खेळवे, विठ्ठलवाडी या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
अकोला तालुस्यातील सांगवी ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला आहे. ही ग्रामपंचायत सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडीचा गड मानला जातो
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
कराड तालुक्यातील शेनोली ग्रामपंचायत ही 13 पैकी 12 जागा मिळवत भाजपच्या अतूल भोसले गटाने आपल्याकडे खेचली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि पर्यायाने पृथ्वीराज चव्हाण गटाला मोठा धक्का बसला आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत पोपटराव पाटील गटाचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत. गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
कोपर्डे ग्रामपंचायतीत सत्ताबदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शिवसेनेला धक्का बसला असून सत्तांतर होत ही ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेली आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
उंब्रज ग्रामपंचायत निवडणूकीत 14 पैकी 13 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती विजय मिळवला आहे. या सर्व जागा बाळासाहेब पाटील गटाने जिंकल्या आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायात ही पूर्णपणे विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाच्या हातात गेली आहे. या ग्रामपंचायतीतील सर्वच्या सर्व 11 जागा जनसुराज्य पक्षाने जिंकल्या आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
माळशिरस तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील गटाने धवलसिंह मोहिते पाटील गटावर वर्चस्व मिळवले आहे. यात कुसमुळ ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गटांना समसमान मते मिळाली आहेत. इतर तिन ठिकाणी मोहितेपाटील गटाच्या रुपात भाजपला यश मिळाले आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असलेल्या खुबी ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाल पुढे आला आहे. या ठिकाणी एकूण 9 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेधवार सर्वाधिक निवडूण आले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकल्याचे चित्र आहे.
![](https://marathi.latestly.com/assets/img/liveblog-shareicon.png)
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीस सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानापासून या मतमोजणीस सुरुवात झाली.
Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021 Live Update: महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणुकीचा निकाल ( Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021) आज (18 जानेवारी 2021) पार पडत आहे. निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले होते. महाराष्ट्रात एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या एकूण 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी निवडणूक पार पडली. या जागांसाठी निवडणूक आयोगाकडे तब्बल 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी काहींनी स्वत:हून अर्ज मागे घेतले. तर काहींचे अर्ज छाननीत बाध झाले त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 2 लाख 41 हजार 598 उमेदवार उतरले. त्यातही पुन्हा जवळपास 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 2 लाख 14 हजार 880 उमदेवरांसाठी मतदान पार पडले.
दरम्यान, महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदान पार पडेल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली आहे. एकूण निवडणुकांपैकी काही गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे या ठिकाणी निवडणूका पार पडल्या नाहीत. तर काही एक दोन ठिकाणी निवडणुकीत आक्षेपार्ह गोष्टी घडल्याचे पुढे आल्याने निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणुका रद्द ठरवल्या.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या दोन ग्रामपंचायतिंची निवडणूक रद्द करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच आणि सद्य पदासाठी लिलाव घेण्यात आला. या ठिकाणी सरपंच पदासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली. या लिलावाची राज्यभर चर्चा रंगली. प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांना घडल्या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले. या घटनेचे सकृतदर्शनी पुरावे आढळल्याने दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द करण्यात आली. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021: ग्रामपंचायत निवडणूक निकाल, गावगाड्यात कुणाचं वर्चस्व? आज चित्र होणार स्पष्ट)
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अद्याप बाकी आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रर्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यांत येणाऱ्या 162 ग्रामपंचायतींसाठी येत्या 20 जानेवारी 2021 या दिवशी मतदान पार पडत आहे, अशी माहितीही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 18 जानेवारी 2021 या दिवशी होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत (आजच्या आणि 20 जानेवारीला होणाऱ्या मतदानाची) निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जानेवारी या दिवशी पार पडणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
संबंधित बातम्या