Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

महाराष्ट्राला किनारपट्टीला काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) झोडपून काढलं आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर आज (26 मे) मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar)  यांनी वादळग्रस्तांसाठी महा विकास आघाडी 250 कोटींची मदत जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या बाबतचा शासन निर्णय उद्या येणार असल्याचीदेखील त्यांनी माहिती दिली आहे. Cyclone Tauktae: 'कर्ज घ्या पण नुकसानग्रस्तांना मदत करा'; नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन.

दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सात जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्याचं म्हटलं आहे. तर तौक्ते चक्रीवादळाची मदत ही एनडीआरएफच्या निकषांपलिकडे जाऊन केली असल्याचेही म्हटलं आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार 'तौक्ते' चक्रीवादळात 72 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण राज्य सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मागील वर्षी निसर्ग आणि यंदा तौक्ते चक्रीवादळ अशी दोन मोठी वादळं पश्चिम किनारपट्टीला नुकसान करून गेल्याने या भागातील फळबाग, मच्छिमार बांधवांसह अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे.

आगामी चक्रीवादळात कोकण किनारपट्टीतील नागरिकांचं नुकसान कमी करण्यासाठी आता विद्युत कॅबेल्स या भुमिगत करण्याचा, निवार्‍यासाठी पक्की सोय करण्याची गरज वडेट्टीवार यांनी देखील बोलून दाखवली आहे. दरम्यान तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक तास ग्रामीण भागात बती गुल होती.

एकीकडे सरकार चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा हात देत असताना विरोधकंकडून सरकार वर टीका केली जात आहे. उद्धव ठाकरेंचा अवघ्या 3 तासांचा पाहणी दौरा आणि कार्यक्रम पाहून अनेकांनी त्यांचयावरून टीकास्त्र डागलं होतं. आज नारायण राणे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.