महाराष्ट्रात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या सरकार विरूद्ध आता शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाने कंबर कसायला सुरूवात केली आहे. आज सकाळी दिल्लीहून राष्ट्रपती भगतसिंह कोश्यारी राज्यात परतले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन 162 आमदारांच्या सहीचं पत्र राज्यापालांना सुपूर्त केलं आहे. दरम्यान यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपाने स्थापन केललं सरकार हे बहुमतातील नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Maharashtra Government Formation Live News Updates: विश्वासदर्शक ठरावासाठी 7 डिसेंबर पर्यंत मुदत द्या; भाजपाची राज्यपालांकडे मागणी.
दरम्यान तातडीने विश्वासदर्शक ठराव घेतला जावा यासाठी मागणी करताना महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सुनावणीमध्ये आजदेखील दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद केला असून सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ उद्या सकाळी 10.30 वाजता त्याचा निकाल देणार आहे.
पहा महाविकासआघाडीचं पत्र
.@Dev_Fadnavis हे बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. त्यांच्या असमर्थतेनंतर @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra तसेच सहयोगी पक्षांना सरकार स्थापनेसाठी तात्काळ पाचारण करावे यासाठी हे पत्र असून पूर्ण बहुमतदर्शक संख्याबळाच्या विधानसभा सदस्यांच्या सह्या या पत्रावर आहेत. pic.twitter.com/n8anE8CTJ4
— NCP (@NCPspeaks) November 25, 2019
दरम्यान महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष कायम असताना महाविकास आघाडीने 162 आमदारांचे पत्र सादर करत सत्तास्थापनेची संधी द्या अशी मागणी देखील केली आहे. तर भाजपाकडून विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी 7 डिसेंबर पर्यंत मुदत मिळवी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.