Jayant Patil | (Photo Credit: Facebook)

Maharashtra Government Formation: शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तिन पक्षांची मिळून तयार झालेल्या महाविकासआघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत आहेत. तसेच, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही उद्धव ठाकरे यांच्याच शिरावर आली आहे. त्यामुळे राज्यशकट हाकण्यासाठी मुख्यमंत्री पदावर आरुड होणारे उद्धव ठाकरे शिवाजी पार्क (Shivaji Park) (शिवतीर्थ) येथे आज (गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेत आहे. यावेळी त्यांच्यासोबत एकूण सहा मंत्री शपथ घेतील. या सहा मंत्र्यांपैकी एक नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. शिवतिर्थ येथे जयंत पाटील यांनी आज मंत्री म्हणून शपथ घेतली.राज्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्या राजकीय जीवप्रवासाबद्दल.

जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक अश्वासक चेहरा आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलही एक अश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. जयंत पाटील यांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा अनुभव आहे. त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प तब्बल 9 वेळा मांडला आहे. जयंत पाटील हे आपल्या नर्णायकी आणि मितभाषी स्वभावासाठी ओळखले जातात. जयंत पाटील यांच्याकडे अत्यंत अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष पद आले. त्याच काळात विधानसभा निवडणूकही आली. या काळातही पाटील यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले. (हेही वाचा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; जाणून घ्या 'मातोश्री' ते 'वर्षा'पर्यंतचा त्यांचा प्रवास)

जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. मुळचे साखराळे येथील असलेल्या जयंत पाटील यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1962 झाला. ते काँग्रेस नेते आणि सहकारमहर्षी राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांना राजवर्धन पाटील आणि प्रतिक पाटील अशी दोन अपत्ये आहेत. जयंत पाटील हे विदेशात होते. मात्र, 1984 मध्ये राजारामबापू यांचे निधन झाले. त्यानंत जनतेच्या आग्रहाखातर ते भारतात आले आणि राज्याच्या राजकारणात प्रवेकर्ते झाले.