Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govrnment) राज्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली (Guidelines) लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील कोरोना संदर्भातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. तसेच या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे मिशन बिगिन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंधांना शिथीलता देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर, राज्यात उद्यापासून (28 मार्च) रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात नव्याने गाइडलाइन जारी केल्या आहेत. हे देखील वाचा- पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासून कोरोनाचे कडक निर्बंध, 'हे' असतील महत्त्वाचे नियम

महाराष्ट्र सरकारच्या नव्या गाइडलाइन-

महाराष्ट्रात काल (शुक्रवारी) तब्बल 36 हजार 902 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर, 112 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 26 लाख 37 हजार 735 वर पोहचली आहे. यातील 23 लाख 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 2 लाख 82 हजार 451 रुग्ण सक्रीय आहेत.