Chandrakant Patil (Photo Credit - Facebook)

महाराष्ट्र कडून मराठा समाजातील (Maratha Community) मुलांना SEBC प्रमाणपत्र देण्यास सुरूवात केली आहे. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWS ऐवजी प्रमाणपत्र बंद केली आहेत. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी CET Cell कडून सक्ती केली जात असताना त्याची पूर्ताता करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमरे 1400 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवेश घेताना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केले. आता सरकारने EWS ऐवजी SEBC सर्टिफिकेट्स सुरू केल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे ती नसल्याने त्यांच्या प्रवेशाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. नक्की वाचा: महाराष्ट्रात NEP 2020 अंमलबजावणी साठी Online Awareness Programme लॉन्च .

दरम्यान या दोन्हींसाठी सारखीच कागदपत्र आवश्यक आहेत. त्याचा वापर नोकरी आणि शिक्षणात पात्र उमेदवार घेऊ शकणार आहेत.