Credit-(Pixabay )

National Education Policy (NEP) 2020 ची अंमलबजावणी महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांमध्ये करण्यात आली असून जनजागृती आणि लोकांना ज्ञान देण्यासाठी नियमितपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत. महाराष्ट्र उच्च शिक्षण विभाग वर सार्वजनिक सहभाग आणि जागरुकता कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. ज्यात तज्ञ Virtual Sessions आणि प्राध्यापकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केली जाणार आहेत.

Maharashtra Higher Education Department चे डिरेक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप्ताहिक व्हर्च्युअल संवादाचे आयोजन केले जाईल जिथे सहभागींना सुधारित शिक्षण पद्धतीबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यानंतर प्रश्न-उत्तर सत्र होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, प्राध्यापक नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली NEP अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.

भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ( NEP 2020 ) ला भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 ला मंजुरी दिली होती.  ऑगस्ट 2021  च्या सुरुवातीला, NEP लागू करण्यासंदर्भात आदेश जारी करणारे कर्नाटक हे पहिले राज्य बनले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना  नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश दिले होते.