देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियम शिथील करत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांची रस्त्यावर गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात केली आहे. तर नागरिकांना आता COVID19 च्या चाचणीसाठी 4400 रुपयांऐवजी 2200 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचणीचे रिपोर्ट्स येण्यासाठी सुरुवातीला काही कालावधी लागत होता. तसेच चाचणी करण्यासाठी सुद्धा भरघोस शुल्क वसूल करण्यात येत होते. परंतु कोरोनाची चाचणी करण्यासाठी लागणारे हे पैसे सर्वांच्या शिखाला परवडणारे असावेत असे ही सांगण्यात आले होते. त्यानंतर आता नागरिकांकडून कोरोनाच्या चाचणीसाठी फक्त 2200 रुपये स्विकारण्यात येणार आहेत. त्याचसोबत घरुन जर नमूने गोळा करण्यासाठी जास्तीत जास्त 2800 रुपये मोजावे लागणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.(मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने लॉन्च केले रोबोटिक डिव्हाईस 'Captain Arjun'; कोविड-19 च्या काळात थर्मल स्क्रिनिंगसह मिळणार 'या' सुविधा (Watch Video)
Maharashtra Government caps maximum price for #COVID19 tests (RT-PCR) at Rs 2200, the earlier price was 4400. Maximum price for the test by collecting samples from home capped at Rs 2800. pic.twitter.com/l1TsEIs6ij
— ANI (@ANI) June 13, 2020
दरम्यान, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहून विविध ठिकाणी कोविडसह क्वारंटाइन सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. त्याचसोबत राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकांमध्ये सुद्धा कोरोनाच्या बाबत जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बद्दल बोलायचे झाल्यास आकडा 1 लाखांच्या पार गेला असून आतापर्यंत 3717 जणांचा बळी गेला आहे.