महाराष्ट्रात कोरोनाविरूद्ध Remdesivir ची क्लिनिकल ट्रायल सुरू; वाढत्या रूग्णसंंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
Remdesivir (Photo Credits: AFP)

महाराष्ट्रामध्ये वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता महाराष्ट्र राज्य सरकारने

Remdesivir या अ‍ॅन्टी व्हायरल ड्रगचं क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे वृत्त इंडियाा टुडेने दिले आहे.  Remdesivir औषध Covid-19 आजाराविरूद्ध प्रभावशाली औषधांपैकी एक आहे. दरम्यान सुरूवातीला राज्यातील 14 सरकारी वैद्यकीय कॉलेज आणि 4 मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये देण्यास सुरूवात केली जाणार आहे. Covid-19 च्या उपचारासाठी राज्य सरकार करणार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शनची खरेदी- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.  

डॉ. तात्याराव लहाने यांनी remdesivir trials बद्दल ऑर्डर इश्यू केली आहे. DMER ने निवडलेल्या हॉस्पिटल्सच्या ethics committees ना ट्रायल सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

राज्यसरकार 3,000 ड्रग्स घेणार असून त्या सुमारे 18 मेडिकल कॉलेजेसना देणार आहेत. याचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि रूग्णांच्या कुटुंबाकडून परवानगी मिळाल्यानंतरच वापरली जाणार आहेत. BDR Pharmaceuticals आणि Hetereo या कंपन्या ट्रायल्ससाठी मोफत औषधं उपलब्ध करून देणार आहेत. त्यानंतर बांग्लादेशी कंपनी Beximco सोबत प्रत्येक बाटलीसाठी $65 मोजले जाणार आहेत.

सध्या भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महराष्ट्रात आहे. मुंबई शहरातही कोरोनाचा धोका अधिक आहे. दिवसागणिक वाढती कोरोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमवला आहे. मात्र, राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.